बँक कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक सुट्ट्यांचे नियोजन करून संप पुकारला !

ग्राहक संघटनांचा आरोप

0 250

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलग सुट्ट्या आणि राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा संप यामुळे या महिन्याच्या अखेरीस सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारणे हा लोकशाहीतील आंदोलनाचा अधिकार असला तरी बँक अधिकारी – कर्मचाऱ्यांनी सलग सुट्ट्यांचे नियोजन करून अत्यंत जाणीवपूर्वक संप पुकारला आहे. त्यांना ग्राहकांच्या गैरसोयीशी काहीही देणेघेणे नाही, असा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने त्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी संप पुकारला आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर २८ रोजी चौथा शनिवार तर २९ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर, ३० सप्टेंबर रोजी अर्धवार्षिक लेखा व्यवहारांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नाहीत. त्यामुळे बँकांची कामं पूर्ण करण्यासाठी एक ऑक्टोबर हा एकच दिवस मिळणार आहे, कारण त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म. गांधी जयंतीमुळे बँकांना सुट्टी असणार आहे.

पाच दिवस सलग बँका बंद राहणार असल्यामुळे ग्राहकांची मोठीच गैरसोय होणार आहे. त्याचा परिणाम एटीएमवरही होणार आहे. यामुळे ग्राहक संघटनांमध्ये रोषाची भावना आहे. लोकशाहीत आपल्या मागण्यांसाठी विविध मार्गाने आंदोलने करण्याचा अधिकार आहे. संप हा त्यापैकीच एका प्रकार आहे. मात्र बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुट्ट्यांचे नियोजन करून जाणीवपूर्वक संप पुकारला आहे. त्यांना बँकेच्या ग्राहकांच्या गैरसोयीशी काहीही देणेघेणे नाही. केवळ स्वार्थासाठीच ग्राहकांना वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More