शिये, शिरोली परिसरातील पंचनामे तत्काळ पूर्ण करा : पालकमंत्री  

0
98

टोप (प्रतिनिधी) : शियेपैकी हनुमाननगर, शिरोली परिसरातील शेतीचे महापुरामध्ये मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त बांधव आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवार) ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी पाटील यांनी नुकसानीची माहिती दिली. तर  औद्योगिक कंपनीमधील मशीनचे नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे करण्याची मागणी केली.

यावर पालकमंत्री पाटील यांनी शिये, शिरोली परिसरातील सर्व ऊस पिकाचे  पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे- भांबुरे यांना दिले. तर औद्योगिक क्षेत्रातील पंचनामे करण्याबाबत हातकणंगले प्रांताधिकारी यांना सूचना देण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, उद्योजक सरदार जाधव, महादेव जाधव, सुदर्शन गाडवे, रमेश तासगावकर, अमर जाधव, पांडुरंग गाडवे, आनंद कांबळे, रमेश इंगवले, बापू पाटील, अमोल मोरे, गंगाराम कांबळे, नामदेव जाधव, दिनेश तासगावकर, यशोदा पाटील, रवींद्र अतिग्रे आदीसह उद्योजक, शेतकरी उपस्थित होते.