दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : दक्षिण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी  कटिबद्ध आहे. मतदार संघातील राज्य मार्ग आणि प्रमुख मार्गांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून १७.९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे आ. ऋतुराज पाटील यांनी सांगितले. ते करवीर तालुक्यातील चुये येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

यावेळी चुये येथे आ. पाटील यांच्या निधीतून म्हसोबा देवालय रस्ता, आनंदा राऊत गल्ली, सखाराम कुंभार ते साताप्पा मगदूम रस्ता, शिवाजी कांबळे ते शिवाजी व्हनाळकर रस्ता, बळवंत कांबळे ते धनसागर देवालय रस्ता, जोतीबा मंदिर ते जुनी ग्रामपंचायत इमारत रस्ता, अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन आदी विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ना. सतेज पाटील यांच्या विकासनिधीतून उभारलेल्या सैनिक भवनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी हरहर महादेव पाणी पुरवठ्याचे चेअरमन शशिकांत पाटील-चुयेकर, व्हाईस चेअरमन अशोक मगदूम, पं.स. सभापती मीनाक्षी पाटील, माजी उपसभापती सागर पाटील, सुयोग वाडकर, सरपंच कविता सावेकर, उपसरपंच सरस्वती मगदूम आदी उपस्थित होते.