आयुक्तांचा इशारा…

0
60

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये, नियमित मास्कचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

त्या म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने ‘नो मास्क नो एन्ट्री’ ही मोहीम गतिमान केली आहे. शहरात विनामास्क फिरणारे तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्याविरुध्द दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरी नागरिकांनी तसेच व्यापारी, व्यावसायिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रस्त्यांवर न थुंकणे या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवत आहे. सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली, तरी धोका मात्र टळलेला नसल्याने नागरिकांनी दिवाळी सण आनंदाने मात्र साधेपणाने साजरा करुन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे.