रस्त्यावर थुंकणाऱ्या युवकाला केला आयुक्तांनी दंड…

0
70

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हुतात्मा पार्क समोर रस्त्यावर थुंकणाऱ्या युवकाला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी पकडून त्याच्यावर एक हजारांच्या दंडाची कारवाई केली.

महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलची भेट आटोपून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हुतात्मा पार्कला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन व सूचना करुन गेटमधून बाहेर पडत होते.  त्यांना समोर रस्त्यावर एक युवक मोटरसायकल थांबवून मास्क काढून रस्त्यांवर थुंकताना दिसला. त्याक्षणी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गाडीतून खाली उतरुन त्या तरुणाला पकडले आणि रस्त्यावर थुंकल्याबद्दल त्याला एक हजारांचा दंड केला. आपली चूक युवकाच्या लक्षात आल्याने त्याने तात्काळ एक हजाराचा दंड भरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here