Published September 30, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  यांनी आज (बुधवार) चक्क सायकलवरुन थेट महापालिकेत प्रवेश केला. निमित्त होते नो व्हेईकल डे चे… 

महानगरपालिकेत प्रत्येक महिन्याचा अखेरचा दिवस नो व्हेईकल डे पाळण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आज सप्टेंबर महिन्याचा अखेरचा दिवस असल्याने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिकेमध्ये होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीला सायकल प्रवास करुन उपस्थित राहिले. तसेच रस्त्यामध्ये त्यांनी मास्क नसलेल्या नागरिकांना मास्क घालण्याची सूचना केली. महापालिकेत सायकलवरुन येऊन त्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजा बरोबरच स्थायी समितीची सभा करुन त्यांनी पुन्हा सायकलवरुन घरी गेले.

नो व्हेईकल डेमुळे शहरातील हवेचे प्रदुषण कमी होऊन पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार असल्याने सर्वांनी महिन्याचा अखेरचा दिवस नो व्हेईकल डे दिवस पाळावा, असे आवाहनही आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023