कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील घरपण येथील कै. बा. रा. मोळे विद्यामंदिर मराठी शाळेत सीसीटीव्ही, बायोमेट्रिक मशीन याचे  उद्घाटन जि. प. चे शिक्षण सभापती रसिका पाटील आणि सदस्य सर्जेराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने हा स्तुत्य उपक्रम राबविला असून पालकातून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी सरपंच प्रज्ञा निकम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी येरूडकर, पोलिस पाटील कविता सुतार,  व्ही. टी. पाटील, टी. एल. मोळे, प्रा. नामदेव मोळे, प्रभाकर मोळे, शिक्षक, ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.