रांगोळी (प्रतिनिधी) :  रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र शासनाने नवीन चालू केलेल्या ऑनलाईन ‘ई पीक’ पाहणी योजनेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी रेंदाळ  गावाचे तलाठी महादेव पाटील यांनी शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन  आपल्या पिकांची ऑनलाइन नोंदणी कशी करायची, याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये ‘ई पीक’ पाहणी ॲप घेऊन कशाप्रकारे नोंदणी करायची, याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी तलाठी  महादेव पाटील,  कोतवाल सयाजी खानविलकर,  संदिप करडे आदीसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी  उपस्थित शेतकऱ्यांनी सदर योजनेबद्दल माहिती घेत समाधान व्यक्त केले आहे.