बामणी येथे व्यायामशाळा बांधकामास प्रारंभ

0
168

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बामणी (ता. कागल) येथे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून   व्यायामशाळा बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामाचा प्रारंभ सरपंच रावसाहेब पाटील यांच्या हस्ते आज (शनिवार) करण्यात आला.

विद्या मंदिर शाळेच्या आवारात व्यायाम शाळा बांधकाम कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, उपाध्यक्ष,    मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस पाटील आदीसह नागरिक उपस्थित होते.