दिलासादायक : रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट, दिवसभरात ४४ जण कोरोनामुक्त

0
86

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान दिवसभरात ४४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९४९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ८, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ४, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा एकूण १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान ४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,९३२.

एकूण डिस्चार्ज : ४६,७०६.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ५५५.

एकूण मृत्यू : १६७१.