दिलासादायक : कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण घटले; दिवसभरात २२ जणांना डिस्चार्ज

0
76

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात एकही कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. दरम्यान दिवसभरात २२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८४४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६:३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ९, चंदगड तालुक्यातील २,  गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील २, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा एकूण २२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर २२जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,८१४.

एकूण डिस्चार्ज : ४६,५४७.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ५९७.

एकूण मृत्यू : १६७०.