दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे  दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तव यांचा भाऊ आणि पीआरओ यांनी राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली आहे.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव हॉटेलमध्ये वर्क आऊट करत होते. ट्रेडमिलवर चालत असताना राजू श्रीवास्तव यांना छातीत दुखू लागले. त्यानंतर राजू श्रीवास्तव खाली पडले. या घटनेनंतर लगेचच राजू श्रीवास्तव यांना रूग्णालयात नेण्यात आलं. राजूचे पीआरओ अजित सक्सेना यांनी सांगितलं की राजू श्रीवास्तव हे दिल्लीत काही राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी आले होते. सकाळी जिममध्ये वर्क आऊट करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लवकरच त्यांना आराम मिळावा, यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव हे उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचे ते चेअरमनही आहेत.
राजू श्रीवास्तव हे त्यांच्या खास प्रकारच्या अनोख्या कॉमेडी शोजसाठी ओळखले जातात. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचे होते. त्यांनी काही सिनेमांमध्येही भूमिका केल्या आहेत. राजूने त्याचे  करिअर स्टेज शोच्या माध्यमातूनच सुरू केले होते.
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच चाहते खूपच चिंतित झाले. राजू श्रीवास्तव यांचा एक खास प्रेक्षक वर्ग आहे. राजू श्रीवास्तवने अनेक स्टेज शो केले आहेत. त्याच्या कॅसेट्स आणि सीडीजही प्रसिद्ध आहेत. अनेक टीव्ही शोजमध्येही राजू श्रीवास्तव झळकले आहेत. सिनेमांमध्येही त्यांनी काम केले आहे.