‘माईंडस्केप’ प्रदर्शनाचे आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

0
70

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ख्यातनाम स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या ‘माईंडस्केप’ या कलाकृतीचे प्रदर्शनाचे आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आज (शनिवार) उद्घाटन करण्यात आले. शाहू स्मारक कला दालन येथे सुरु असलेल्या प्रदर्शनात डॉ. भोजराज यांच्या ८२ कलाकृती मांडण्यात आल्या असून २२ मेपर्यंत हे कलाप्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात फोटोग्राफी, स्केचिंग, पेंटिंग, डिजिटल लायझेशनचा वापर करुन नैसर्गिक आणि सामजिक आशय असलेली वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. डॉ. भोजराज यांच्या प्रदर्शनातून मिळणारी रक्कम ही स्पाईन फौंडेशनच्या कार्यासाठी वापरली जाणार आहे.

यावेळी डॉ. सलीम लाड, डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. प्रेमीक नागड, डॉ. तुषार देवरे, जॉय चौधरी, ममता देसाई यांच्यासह स्पाईन फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते.