मडूर येथे आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम…

0
62

गारगोटी (प्रतिनिधी) : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस नेहमीच विधायक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येतो. आज (गुरुवार) त्यांचा वाढदिवस भुदरगड तालुक्यात देखील विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.

यावेळी भुदरगड तालुक्यातील मडूर येथे भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील, गारगोटी ग्रा.पं. सदस्य अलकेश कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रशाळा मङूर आणि विद्यामंदिर कासारवाडी या दोन शाळा पूर्णतः सॅनेटाईज करण्यात आल्या. या दोन्ही शाळांमध्ये अनेक कोव्हिड पेशंट वास्तव्यास होते. १५ जूनपासून प्राथमिक शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शाळा पूर्णतः सॅने टाईज करण्यात आल्या.

या उपक्रमात अवधूत राणे, किरण फगरे, विश्वास रणदिवे, दिलीप मोहीते, रोहीत राणे, सुरेश फगरे, प्रसाद, गुरव, चाचा नायकवडे, कार्यकर्ते सहभागी झाले होते.