हातकणंगले येथे आ. नाना पटोले यांचा भाजपाच्या वतीने निषेध…

0
29

टोप (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करत भाजपाच्या वतीने हातकणंगले इथे आज (मंगळवार) करण्यात आली. तसेच आ. पटोले यांच्या पोस्टराला जोडे मारत तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

आ. पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अनुद्गार काढले होते. मी त्यांना मारु शकतो अस वक्तव्यही केले होते. यामुळे पटोले यांनी देशाचा तसेच पंतप्रधानांचा अपमान केला आहे. यासाठी हातकणंगले तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी तहसिलदार कार्यालयासमोर आ. पटोले यांचा निषेध करीत त्यांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन केले. तसेच आ. पटोले यांच्यावर कारवाईची मागणीचे निवेदन हातकणंगले तहसिलदार आणि पोलीसांना देण्यात आले.

यावेळी भाजपायुवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, जिल्हाउपाध्यक्ष अरविंद माने, जिनेंद्र देसाई, पंकज बुढ्ढे, दिनानाथ मोरे, प्रविण रांगोळे, गितांजली राजमाने, उमा ठिगळे, प्रदिप मिरजकर, शिवाजी पुजारी, कार्यकर्ते उपस्थित होते.