आ. चंद्रकांत जाधव यांच्या कुटुंबीयांचे राजकीय नेते, नागरीकांनी केले सांत्वन..

0
75

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार व यशस्वी उद्योजक आमदार चंद्रकांत जाधव यांचे काल (गुरुवार) आकस्मिक निधन झाले. आज त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राजकीय मान्यवरांसह भागांतील नागरिक महिलांनी मोठी गर्दी केली होती. 

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, माजी आ. चंद्रदीप नरके, निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, निवृत्त पोलिस उपअधीक्षक सतीश माने, सुरेशदादा पाटील, राजेश लाटकर, रुपाराणी निकम, उमा इंगळे, गीता गुरव, सविता भालकर, भाजपचे राहुल चिक्कोडे, अभिजित पायमल, आनंदराव पायमल, संग्राम निकम, सुनिल शिपुगडे, रत्नेश शिरोळकर, महेश वासुदेव यांच्यासह गोविंद सोसायटी महिला मंडळ, पायमल वसाहत येथील नवदुर्गा महिला मंडळ, अंबाई डिफेन्स कॉलनी महिला मंडळ, सरनाईक वसाहत महिला मंडळ यांच्यासह शहरातील विविध भागांतील नागरिक, उद्योजक, विशेषतः विद्यार्थी व महिलांची आमदार जाधव यांच्या घरी सांत्वनासाठी रीघ लागली होती.

आज सांत्वनासाठी आलेल्या नागरिकांमध्ये महिला विद्यार्थी यांची मोठी संख्या होती आमदार जाधव यांनी केलेल्या मदतीची आठवण सांगताना त्यांना गहिवरून येत होते. अनेक विद्यार्थ्यांनी साहेबांनी केलेल्या मदतीमुळेच शिक्षण पूर्ण करता आल्याचे सांगितले. तर साहेबांच्या मदतीमुळेच मला व्यवसाय सुरू करता आल्याचे काहींनी सांगितले. तर काहींनी साहेबांच्या मदतीमुळेच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेताना बीलासहीत कोणतीही अडचण न आल्याचे सांगितले.