दिवंगत आ. भारत भालकेंच्या सुपुत्रासाठी संभाजीराजेंचे आवाहन

0
153

पंढरपूर (प्रतिनिधी) : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भगीरथ भालके यांना बिनविरोध निवडून देऊन स्वर्गीय आमदार भारत भालके यांना श्रद्धांजली व्यक्त करू, असे आवाहन केले आहे. खासदार संभाजीराजे यांनी आज (सोमवारी) सकाळी सरकोली येथे भालके कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले.

यावेळी संभाजीराजे म्हणाले की, भारत भालकेंच्या निधनाने बहुजन समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न होतो. या सोहळ्यासाठी मदत करणारे ते एकमेव आमदार होते. त्यांचे मराठा समाजासाठीचे योगदान महत्त्वपूर्ण होते. अशा व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे. भगीरथ भालके यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. येणाऱ्या काळात पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी माझ्या स्तरावर सर्व प्रयत्न करणार आहे. निवडणूक झाली तर त्यांच्यासोबत शक्ती उभी करेन.