युवकाच्या लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी आ. ऋतुराज पाटील यांची ‘लाख’मोलाची मदत

0
179

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील राहुल आनंदराव गुरव या १८ वर्षीय युवकाच्या  यकृत  प्रत्यारोपणासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी एक लाख रुपयांची मदत दिली आहे. राहूलच्या यकृत प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये होणार आहे. त्यासाठी गुरव कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज होती. याची माहिती आ.पाटील यांना मिळाल्यानंतर यांनी तात्काळ गुरव यांना १ लाखांची मदत देऊ केली. राहुलवर यकृत प्रत्यारोपण लवकरच होणार आहे.