हुतात्मा स्तंभाच्या सुशोभीकरणासाठी आ. चंद्रकांत जाधव यांच्या फंडातून ४० लाख मंजूर : भूपाल शेटे

0
18

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ इथे असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वा. क्रांतीज्योत मिरवणुकीचे आयोजन केले आहे. या स्तंभाच्या सुशोभीकरणासाठी आ. चंद्रकांत जाधव यांच्या फंडातून ४० लाख रुपये मंजूर झाल्याचे हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भूपाल शेटे यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

भूपाल शेटे म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन ही क्रांतीज्योत काढण्यात येणार आहे. क्रांतीज्योतीचे हे ४३ वे वर्ष असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योत मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, दैवज्ञ बोर्डिंग मार्गे परत हुतात्मा स्तंभावर येऊन याची सांगता होणार आहे.

या पत्रकार परिषदेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कल्याणकर, उपाध्यक्ष संजय चोडणकर, कार्याध्यक्ष रामेश्वर पत्की, सचिव प्रविण मोहिते उपस्थित होते.