पन्हाळा (प्रतिनिधी) :  युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार) यांच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्र आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सोमवार पेठ (ता. पन्हाळा) येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. रविवार पेठ येथील स्वराज्य स्पोर्ट्सच्या मैदानावर झालेल्या  स्पर्धेसाठी तालुक्यातून ८ संघांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेतील अंतिम सामना संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालय विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स, रविवार पेठ यांच्यात झाला. यामध्ये संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयाने एकूण तीन सेट पैकी दोन सेट जिंकत प्रथम क्रमांक मिळवला. तर स्वराज्य स्पोर्ट्स यांना व्दितीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आठ संघातील एकूण १२ मुले जिल्हास्तरावर होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र झाली आहेत.

या स्पर्धेसाठी पन्हाळा तालुका क्रीडा प्रतिनिधी अमित हुजरे, नितीन भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी ऑर्गनायझर म्हणून नितीन बहादुरे यांनी काम पाहिले. विजयी संघास  संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य डॉ. मोहन बी. वनरोट्टी,  क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत इंगवले  यांचे मार्गदर्शन लाभले.