कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन स्पष्‍टीकरणाद्वारे काही बाबी व सेवांचा अत्यावश्यक बाबी व सेवा म्हणून समावेश करण्यात आलेल्या आहेत. दि. ५ व ६ एप्रिल रोजीच्या आदेशामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (गुरुवार) निर्गमित केले.    

  1. अत्यावश्यक सेवामध्ये खालील अत्यावश्यक सेवांचाही अधिकचा समावेश करण्यात आलेला आहे.
  2. पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, ब) सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, क) डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, ड) शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, इ) फळविक्रेते, ई) जनावरांचे सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, ॲनिमल केअर सेंटर्स व पेट शॉप्स, उ) दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभालविषयक बाबी, ऊ) गॅस सिलेंडर्सचा पुरवठा
  3. खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी ७ ते रात्रो ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भारत सरकारच्या निकषानूसार तात्काळ लसीकरण करणेत यावे. जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत, १५ दिवस वैध असलेले कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर / रॅपिड अँटिजेन टेस्ट प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागेल.

या नियमाची दिनांक १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि उल्लंघन करणारे रक्कम रुपये १, ००० दंड आकारण्यास पात्र राहतील.                                                                                                 

अ) स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स आणि सेबीशी संलग्न संस्था व वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था, स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ

ब) रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि रिझर्व्ह बँकेकडून नियंत्रित वित्तीय संस्थाची कार्यालये, क) सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे, ड) सर्व मायक्रो फायनान्स संस्था, इ) सर्व अधिवक्ता वकिल यांची  कार्यालये, ई) कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर (लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)

  • ज्या व्यक्ती रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असतील, त्यांना  अधिकृत तिकिट स्वत: जवळ बाळगावे लागेल.
  • औद्योगिक कामगारांना ओळखपत्राच्या आधारे रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत तसेच शुक्रवार ते सोमवार या संचारबंदी कालावधीत, कामाच्या पाळ्यानुसार त्यांच्या खाजगी वाहने / खाजगी बसेसव्दारे ये-जा करता येईल.
  • शनिवार व रविवार या दिवशी लग्नसमारंभास परवानगी नाही.
  • परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास, परिक्षेसाठी हजर राहणेसाठी तसेच रात्री ८ नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर प्रवेशपत्र स्वत: जवळ बाळगून प्रवास करणेस परवानगी असेल.
  • सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ८ या कालावधीत फक्त अत्यावश्यक वस्तूंच्या विक्री करणे कामी मॉल्स चालू ठेवणेस परवानगी असेल. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य साहित्य विक्री करणेस मनाई असेल.
  • जिल्ह्यातील सर्व सेतू कार्यालये सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत फक्त ऑनलाईन कामकाजासाठी चालू ठेवणेस परवानगी राहील.
  • बांधकाम व्यवसायाशी निगडीत दुकानदार यांनी बांधकाम व्यवसाईकांकडून ऑनलाईन ऑर्डर्स / बुकिंग घेवून गोदामातून सदर माल बांधकाम साईटवर पोहोच करणेचा आहे. (दुकाने उघडण्यास मुभा असणार नाही.)
  • सनदी लेखापाल (C.A.) / जीएसटी कंन्स्लटंट यांना ऑन लाईन कामकाजासाठी मुभा असेल. (कार्यालय न उघडता सेवा देणे.
  • ४. अ) सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरू ठेवणेबाबत यापूर्वी काही अटीवर परवानगी देणेत आलेली आहे. सदरबाबत सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरळीत राहणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या वाहतुक व्यवस्थेशी निगडीत अनुषांगिक सेवा यांचाही यामध्ये समावेश करणेत येत आहे. विमानतळावर आवश्यक असलेल्या मालवाहतुक, तिकिट व्यवस्था या अनुषांगीक सेवांचाही यामध्ये समावेश असेल.

ब) शेती संबंधित सेवा, शेतीकामासाठी लागणारे सर्व सेवा, बि- बियाणे, खते, औजारे आणि त्यांची दुरूस्ती सेवा, शेती माल वाहतूक दुरुस्ती उद्योग (उदा. शेती औजारे, वाहन दुरुस्ती, स्पेअर पार्टस, पंक्चर काढण्याची दुकाने इत्यादी) सुरू ठेवणेस परवानगी असेल.

इ) चिकन, मटण, अंडी, मासे यांची दुकाने व कुक्कटपालन उद्योग, जनावरांचा चारा आणि या सर्व बाबींकरीता आवश्यक असलेला कच्चा माल गोदामे यांचाही समावेश असेल.