नृसिंहवाडी येथील दत्तजयंती महोत्सव रद्द : जिल्हाधिकारी

0
766

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप त्याचा धोका टळलेला नाही. त्यामुळे त्याचा संसर्ग रोखण्यासाठी नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मंदिरामध्ये २९ डिसेंबर रोजी होणारा दत्तजयंती महोत्सव रद्द करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरामध्ये २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्तजयंती महोत्सवासाठी भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता  नाकारता येत नसल्याने हा महोत्सव रद्द करण्यात येत आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा या आदेशात देण्यात आला आहे.