सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी : जिल्हाधिकारी

0
76

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बंदिस्त सभागृहे किंवा मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळून सुरू करण्यास परवानगी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

दौलत देसाई यांनी सांगितले की, चित्रपट, नाटक वगळता बंदिस्त सभागृह व इतर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश देताना थर्मल टेस्टव्दारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घ्यावी, बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये, बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ, प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर किमान ६ फूट ठेवावे, बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी, सभागृहातील सर्व परिसर, खोल्या, प्रसाधनगृहे वेळोवेळी स्वच्छ करण्याबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक तयार करावे, प्रसाधनगृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी, बंदिस्त सभागृहात सर्वांनी मास्क लावणे आवश्यक राहील आदी नियमांचे पालन करूनच कार्यक्रमाचे आयोजन करावे.