जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत वाढली…

0
83

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक ३० नोव्हेंबर रोजी रात्री १२ पर्यंत वाढविण्यात आली असून नमूद केलेली प्रतिबंधित /बंद क्षेत्रे व सूट / वगळण्यात आलेली क्षेत्रे कायम ठेवण्यात येत असल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज (शनिवार) दिला.

जिल्हाधिकारी देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी /क्षेत्र पूर्ववत सुरू राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश या आदेशास संलग्न राहतील. हे आदेश ३० नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात राहतील. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६०(४५) याचा कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.