कोल्हापुरात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा

0
33

कोल्हापूर (प्रतिनिधी): शहरातील विविध ठिकाणी राबवलेल्या महास्वच्छता अभियानात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९६ वा रविवार होता.
शेंडापार्क ते एसएससी बोर्ड, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी मेनरोड, खानविलकर पंप ते रमनमळा चौक, दसरा चौक ते खानविलकर पंप, टेंबलाईवाडी ब्रिज, लिशा हॉटेल चौक ते कावळा नाका परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वरा फौंडेशनच्यावतीने रंकाळा परिसरात स्वच्छता करण्यात आली. रंकाळा रोडवर साइडच्या बाजूने लालमाती टाकून वेगवेगळी फुलांची झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी रंकाळा तलाव तेथील व्यावसायिकांनी आपला कचरा डस्ट बिनमध्ये ठेऊन कचरा कुंडीत टाकावा व लालमाती व झाडे लावली आहेत तेथे कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नका असे आवाहनही करण्यात आले. यावेळी स्वरा फौंडेशनचे डायरेक्टर प्रमोद माजगावकर, प्राजक्ता माजगावकर, अध्यक्ष सविता पाडलकर, उपाध्यक्ष अमृता वास्कर, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, डॉ. अविनाश शिंदे, फैजाण देसाई, साक्षी गुंडकली, संमेश कांबळे, आयुश शिंदे, सरफराज मिद्या, धर्मराज पाडलकर, शेखर वडणगेकर, काका पाडलकर व सदस्य उपस्थीत होते.