कॉ. दत्ता मोरे यांची वाटचाल पुढील पिढीसाठी मार्गदर्शक : राहूल देसाई

0
76

गारगोटी (प्रतिनिधी) : शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, डंगे धनगर, असंघटीत कामगार यांच्यासाठी कॉ. दत्ता मोरेंची वाटचाल पुढील पिढीसाठी निश्चित मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन युवक नेते राहुल देसाई यांनी केले. ते स्वातंत्र्य सेनानी कॉ. दत्ता मोरे यांच्या ९३ व्या जयंती निमित्त गारगोटीमध्ये ग्रा.पं. कर्मचारी सत्कार कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, कॉ. दत्ता मोरेंनी आपल्या आयुष्यात तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. दृष्टा नेता, कठोर प्रशासक, आणि पाचवीला पुजलेल्या संघर्षाची कास धरत विविध प्रश्नांना ते सामोरे जात होते. या स्वभावामुळे प्रशासनावर त्यांनी आपला वचक निर्माण केला होता. त्यांच्या जाण्याने आपण एका मार्गदर्शकाला मुकलो असून त्यांच्या स्मृती चिरंतन रहाण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

यावेळी गारगोटी ग्रामपंचायतीच्या ५६ कामगारांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाची दखल घेऊन मोरे कुटूंबीयांच्या वतीने प्रत्येकी १ हजार रूपयांचा मदतनिधी देऊन सत्कार करण्यात आला. कॉ. दत्ता मोरे यांनी स्थापन केलेल्या किसान संस्था समूहाच्या वतीने भुदरगड तालुका संघाचे चेअरमन बाळ देसाई आणि कॉ. राम कळंबेकर यांच्या हस्ते किसान हॉल येथे प्रातिमा पुजन करण्यात आले.

यावेळी ग्रा.प. सदस्य अलकेश कांदळकर, जयराज देसाई, सचिन देसाई, प्रकाश वास्कर, सौ. आशाताई भाट, रुपाली कुरळे, सुकेशीनी सावंत, आस्मिता कांबळे, सुभाष मोरे, मानसिंग मोरे, संतोष सदावर्ते, गजानन भाट, मिलिंद मिरजकर, सुरेश शिंदे, ग्रामस्थ उपस्थित होते.