कुंभोजगिरी डोंगराचा परिसराची साफसफाई…

0
339

कुंभोज (प्रतिनिधी) : दक्षिण महाराष्ट्रचे मिनी शत्रुंजय कुंभोजगिरी तीर्थामध्ये आचार्यदेव श्री अजितशेखर सूरीश्वरजी महाराज ४५ व्या दिक्षा दिवसानिमित युवा शिबिर तसेच श्री कुंभोजगिरी तीर्थ सत्कार आणि शुद्धिकरणाचे आयोजन करण्यात आले होते.श्री कुंभोजगिरी तीर्थ सत्कार आणि शुद्धिकरणाची सुरुवात सकाळी करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, पेठवडगांव, इस्लामपुर, सांगली, जयसिंगपूर, कराड, पूणे आदी भागातील विविध भागातून सुमारे ३०० कार्यकर्ते सामिल झाले होते.

तसेच कुंभोजगिरी डोंगराचा परिसर आणि मंदिराची स्वच्छता करण्यात आली. इचलकरंजीच्या सह्याद्री अॅडव्हेन्चरच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 250 पोती भरून कचरा गोळा केला. या सर्व कार्यकर्त्याना टोपी, मास्क, ग्लोज पुरविण्यात आले होते. तसेच डोंगरावर सफाईसाठी रोप, फावड़े, खुरपे इत्यादी साहित्य पुरवण्यात आले.