कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानामध्ये २ टन कचरा आणि प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. या मोहिमेत खासबाग मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह संपूर्ण परिसर, रंकाळा रोड, दिगंबर जैन बोर्डिंग मेनरोड, पितळी गणपती मंदीर चौक ते डीएसपी चौक, शिरोली नाका मेनरोड परिसराची स्वच्छता करण्यात आली.

वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेने चार टिम विभागून लक्ष्मीपूरी येथील शाहू क्लॉथ मार्केट परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. यामध्ये पारिजात, हळदी, कुंकू, भद्राक्ष, शंकासूर, करंज, कांचन अशी झूडूप पध्दतीची झाडे लावण्यात आली. पंचगंगा नदी परिसर, रेल्वे फाटक, राजाराम उद्यान, टाकाळा, जनता बझार चौक, बागल चौक, उद्यमनगर येथील असणाऱ्या जुन्या झाडांना पाणी घालून, अनावश्यक तन काढून, औषध फवारणी व प्लॅस्टिक कचरा गोळा करुन स्वच्छता करुन घेतली.

अभियानामध्ये उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, चेतन कोंडे, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, वृक्षप्रेमी वेल्फेर ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे व कार्यकर्ते, स्वच्छतादूत अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे एनएसएसचे विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.