पन्हाळा (प्रतिनिधी) : राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने महिन्यातील प्रत्येक दुसर्‍या अथवा चौथ्या रविवारी गड संवर्धनाचे काम करण्यात येते. पन्हाळा गडावर परिवाराच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून दीड टन कचरा गोळा केला. या मोहिमेत १७५ जणांनी सहभाग घेतला.

परिवारातर्फे ४० वी मोहीम प्लॅस्टिकमुक्त पन्हाळगड या संकल्पनेवर रविवारी पार पाडली. या मोहिमेंतर्गत साधारण २ ते ३ तासात तब्बल दीड टन कचरा गोळा करून पन्हाळा नगरपरिषदेकडे सुपूर्द केला. यावेळी परिवारातर्फे प्लॅस्टिकमुक्त पन्हाळा गडासाठी जिल्ह्यातील शिवशंभू पाईकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान,  महिला सक्षमीकरण, रोजगार मार्गदर्शन, ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन परिवार करत असतो. कोल्हापूर विभागाकडून देखील पन्हाळगडावर संवर्धनाचे काम गेली अनेक वर्ष सुरू आहे.