कोतोली (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील तिरपण येथील राजर्षी शाहू तरुण मंडळच्या वतीने येथील भैरवनाथ मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात वाढलेली झाडे-झुडपे, आजूबाजूला असणारा घनकचरा याची स्वच्छता केली. तसेच गुरुवारी वटपौर्णिमा असल्याने भैरवनाथ मंदिराला लागून असणाऱ्या वडाच्या झाडाच्या परिसराची देखील स्वच्छता करण्यात आली.

यामध्ये अरुण माने, प्रकाश पाटील, सागर पाटील, सचिन माने, सरदार माने, निखिल पाटील, चंद्रदीप यादव, विनायक पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रथमेश पाटील यांनी सहभाग घेतला होता.