वडणगे येथे मित्राच्याच घरात केला हात साफ; तीस हजारांचा मुद्देमाल लंपास

0
88

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मित्राच्याच घरामध्ये राहणाऱ्या एकाने मित्राची मोटरसायकल आणि मोबाईल असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी खय्युम गफूर नरंगलकर (वय २२, मूळ रा. नरंगलक देगळूर जि. नांदेड, सध्या रा. वडणगे) याने आकाशसिंग रणजीतसिंग ठाकूर (मूळ रा. असापूर, जि. नांदेड, सध्या रा. वडणगे) याच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  खय्युम नरंगलकर हा गेल्या काही महिन्यांपासून वडणगे येथे राहतो. त्याच्या घरामध्ये त्याचे मित्र आकाशसिंग ठाकूर आणि सुरेश कांबळे हे देखील राहतात. काल (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास आकाशसिंग ठाकूर याने खय्युम नरंगलकर याची मोटरसायकल व मोबाईल असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही बाब लक्षात येताच खय्युम नरंगलकर याने आकाश सिंग ठाकूर यांच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.