मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई बँकेत १२३ कोटींच्या घोटाळा प्रकरणी भाजप नेते आ. प्रवीण दरेकर यांना सबळ पुराव्या अभावी आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चीट दिली आहे.

आ. प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँकेत १२३ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल मुंबईतील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या दाखल केलेल्या आरोपपत्रातून मुंबई बँकेचे अध्यक्ष, आ. प्रवीण दरेकर आणि इतर संचालकांची नावे वगळण्यात आली आहेत. या सर्वांविरुद्ध पुरावे नसल्याचे म्हटले आहे. यामुळे दरेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बनावट कागदपत्रे आणि अध्यक्ष, संचालक आणि पदाधिकाऱ्यांच्या पदाचा दुरूपयोग करून १२३ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप प्रवीण दरेकरांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी दरेकरांवर आरोप केल्यानंतर सुनावणी सुरू होती. यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे.