मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध आणि पद्म पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान (वय ९०) यांचे आज (रविवार) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मुस्तफा खान यांचा जन्म ३ मार्च १९३२ साली उत्तर प्रदेशामधील बदायूं येथे  झाला होता. भारतीय शास्त्रीय संगीतातील रामपुर सहसवान घराण्याशी त्यांचा संबंध होता. उस्ताद गुलाम मुस्तफा यांनी गीता दत्त, मन्ना डे, लता मंगेशकर, आशा भोसले, ए. आर रहमान, सोनू निगम, हरिहरन, शान, यांना गायनाचे धडे दिले. त्यांच्या निधनाबद्दल लता मंगेशकर, ए.आर रहमान यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.