कोल्हापूर (प्रतिनिधी) : अठरा वर्षावरील नागरिकांना लस घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर आणि ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या सहकार्याने सशुल्क कोव्हिड लसीकरण कॅम्प घेण्यात आला. धैर्यप्रसाद मंगल कार्यालय येथे आयोजित या कॅम्पमध्ये ४०० हून अधिक जणांनी लस घेतली.

छ. मालोजीराजे यांच्या हस्ते आणि आ. जयंत आसगांवकर,नरेश चंदवाणी, ऋतुराज इंगळे, अमर गांधी, तेज घाटगे, जयेश कदम, शाम कोरगांवकर, राजू निकम, राजीव लिंग्रस, अशोक रामचंदानी, प्रनील इंगळे, गौरव खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

कोविड लसीशी असणारी टंचाई लक्षात घेऊन रत्नेश शिरोळकर यांनी सशुल्क कोवीड लसीकरण कॅम्प घेण्याचे ठरविले. सोशल मीडियाद्वारे नागरिकांना पैसे भरून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत ताराबाई पार्क आणि शहरातील अठरा वर्षांवरील लोकांचा पहिला डोस पहिली लस घेऊन ८४ दिवस झालेले अशा ४०० जणांनी लस घेतली.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र रेजिस्ट्रेशन काउंटर, बुकिंग काउंटर आणि लसीकरण काउंटर यांची व्यवस्था करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सचे पाळण करत लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे आलेल्या लोकांसाठी मिनरल वॉटर, चहा, बिस्कीट याची व्यवस्था करण्यात आली होती.