नागरीकांना थकीत पाणी बिलात सुट : डॉ. कांदबरी बलकवडे (व्हिडिओ)

0
74

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर पाणी पुरवठा विभागाकडील थकीत पाणी बिलाची रक्कम प्रभावीपणे व कार्यक्षमपणे वसुली करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत फेब्रुवारी व मार्चमध्ये विशेष सवलत योजना राबविण्यात येत आहे. सदर सवलत योजने अंतर्गत पाणी बिलाची संपूर्ण थकबाकी जमा केल्यास विलंब आकारामध्ये फेब्रुवारी २०२१ अखेर ४० टक्के आणि मार्च २०२१ अखेर ३० टक्के सूट सवलत देण्यात येणार असल्याचे प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी सांगितले.