शिरोळ (प्रतिनिधी) : येथील खासगी व शेतजमिनीवर नगरपरिषदेमार्फत नागरिकांना विश्वासात न घेता आरक्षण टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. खासगी व शेतजमिनीवर होणाऱ्या आरक्षणाला शिरोळ येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच आरक्षण पडणाऱ्या प्लॉटधारकांनी एकत्र येऊन विरोध करायचे ठरवले आहे.

वाडवडिलांपासून असलेल्या जमिनी तसेच परिश्रमाने कमावलेली मिळकत आम्ही देणार नाही, असे मनोगत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी पृथ्वीराजसिंह यादव, धनाजी चुडमुंगे, पांडुरंग माने, पत्रकार दगडू माने, नगरसेवक पंडित काळे, इमरान आत्तार, विजय आरगे, गजानन संकपाळ, नीलकंठ फल्ले, धनाजी नरदेकर, संभाजी भोसले आदींसह गावातील ज्येष्ठ नागरिक व प्लॉटधारक उपस्थित होते.