इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहर परिसरात वाढणारी गुन्हेगारी कशी कमी व्हावी, यासाठी नागरिकांच्या तक्रारींचे योग्य निरसन होणे आवश्यक असते. ते जर होत नसेल तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असा इशारा कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिला. ते आज (सोमवार) इचलकरंजीत बोलत होते.

यावेळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी बी.बी.महामुनी, सपोनि. गजेंद्र लोहार यांची बैठक घेवून इचलकरंजी शहरातील सर्व घडामोडींचा आढावा घेतला. तसेच मुंबई सारखी सेफ सिटीतंर्गत सीसीटिव्ही कॅमेरे आणि कंट्रोल रुम यासंदर्भात कामकाजाची पाहणी करून माहिती घेतली. तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा धाक निर्माण होणे आवश्यक असून त्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्नशील असल्याचे सांगितले.