कोल्हापूर  (प्रतिनिधी) : पाणीपट्टी आकारणी व वसुलीसाठी   महानगरपालिकेच्यावतीने स्पॉट बिल आणि  स्पॉट कलेक्शन प्रकल्प  कार्यान्वित करण्यात आला असून गेल्या वर्षी २८०३६ कनेक्शनधारकांनी  लाभ घेतला असून सुमारे ५,४०,८९,२४७ रुपये इतकी रक्कम जागेवरच  जमा झाली अ सल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे राबविण्यासाठी सन २०१६ पासून स्पॉट बिल आणि स्पॉट  कलेक्शन हा महत्वाकांक्षी प्रकल्प चालू करण्यात आला आहे. या प्रकल्पाव्दारे नागरिकांना पाणी बिलाची आकारणी करुन प्रत्यक्ष जागेवर छापील बिल देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच ज्यांना नागरी  सुविधा केंद्रामध्ये  जाऊन बिलाची रक्कम भरणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी जागेवरच  बिलाची रक्कम स्विकारुन त्याची पोहोच पावती देण्याची सुविधा उपलब्ध  करुन दिली आहे.

तरी शहरातील सर्व नागरीकांना आणि कोल्हापूर शहर  पाणी पुरवठा केंद्रावर अवलंबून असलेल्या आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना महानगरपालिकेच्या स्पॉट बिल आणि स्पॉट कलेक्शन  नागरी सुविधाकेंद्राकडे बिल भरणे शक्य नाही, त्यांनी आपल्या दारामध्ये  रिडींग घेण्यासाठी आलेल्या अधिकृत मिटर रिडर्स यांच्याकडे पाणी बिलाची  रक्कम जागेवरच भरुन जागेवरच संगणकीकृत पोहोच पावती घेऊन या योजनेचालाभ घ्यावा. या प्रकल्पामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैशाची बचत होणार आहे. जर एखादा मीटररिडर पैसे भरुन घेण्यास नकार देत असेल तर त्याच्या विरुध्द पाणी पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार करावी.