सिनेकलाकारांनाही स्ट्रिट फूड, जंक फूडची भुरळ

0
15

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या आहाराबाबत फारच दक्ष असतात. विशेष काळजी घेत असतात. पण  हा आपला गैरसमज आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असे काही कलाकार आहेत. त्यांना फास्ट फूड खायला खूप आवडते. हे त्यांच्या आवडीच्या पदार्थांवर ताव मारतानाच्या समोर आलेल्या फोटोवरून स्पष्ट होत आहे. पाहूयात असे काही कलाकार ज्यांना स्ट्रिट फूड आणि जंक फूड खाण्याची आवड आहे.

बॉलिवूडमधील अभिनेत्री कतरिना कैफला चिट मिलमध्ये जंक फूड खाण्याची आवड आहे.  तिला डोसा आणि  सी- फूडमध्ये  कोळंबी आणि खेकडे फार आवडतात.

सोनम कपूरला व्हिएतनामी आणि बंगाली पदार्थ आवडतात. मुंबईमधील अमर ज्यूस सेंटरमधील पावभाजी आणि एल्को येथील पाणीपुरी तिला खायला आवडते.

अभिनेत्री अनुष्का शर्माला समर्पण येथील चायनिज खूप आवडते. तसेच तिला बंगळुरूमधील कॅफे पिकोलो येथे इटालियन पदार्थ खायला आवडतात.

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला मुंबईमधील कॅफे नुरी मधील बिर्याणी प्रचंड आवडते.

बॉलिवूडचा बादशाहा शाहरूख खानला दिल्ली येथील छोले भटूरे खूप आवडतात. तसेच त्याला मुंबईमधील खार येथेल मंजू डोसा सेंटरचा डोसाही खूप आवडतो.