बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूबद्दल अनेक शंका उपस्थितीत केलेल्या होत्या. हा घात आहे की अपघात? असा प्रश्न खुद्द मेटे कुटुंबीयांनीच उपस्थितीत केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाबद्दल ज्योती मेटे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

शिवाय महामार्गावर अपघात झाल्यानंतर तातडीने मदत मिळाली तर अनेकांचे प्राण वाचतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. राज्य सरकारने स्वर्गीय विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी दिल्याने मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. महामार्गावर अपघाताच्या वेळी लवकर मदत मिळाली तर अनेकांचे जीव वाचतील.

बीड शहरातील तुकाई निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या, विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी राज्य सरकारने सीआयडीकडे चौकशी दिली. त्यामुळे मेटे परिवार आणि शिव संग्राम आभारी आहे. महामार्गावरील अपघातात लवकरात लवकर मदत मिळाली तर शून्य मृत्यू होतील.