कोल्हापूर (प्रतिनिधी) आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. कारण, आज (शनिवार) चित्री धरण शंभर टक्के भरले आहे. चित्री धरण भरल्यामुळे आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत चित्रीचे पाणी पूजन करण्यात आले.
यावेळी भीमराव राजाराम, शिवाजी राणे, आदित्य पाटील, नितीन पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत पाणी पूजन करण्यात आले. यावेळी आजरा तालुक्यातील ज्येष्ठ नेते विष्णुपंत केसरकर, वीरशव बँकेचे व्हाईस चेअरमन सदानंद हत्तरगी, हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे, सतीश पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरुंबे, रमेश पाटील, राकेश पाटील, चंद्रकांत जागनूरे उपस्थित होते.