संजय राठोड यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या चित्रा वाघ अडचणीत..?

0
648

मुंबई  (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर सातत्याने आवाज उठवून  वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. दरम्यान, याआधी किशोर वाघ यांना अटक झाली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे.  

किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारीरोजी गुन्हा दाखल केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ यांनी आक्रमक  भूमिका घेत  वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले  आहे.

दरम्यान, मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही माहिती न देता गुन्हा दाखल केला आहे.  आमची बाजू मांडण्याची संधी देखील दिलेली नाही. सुडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आलेला  आहे.  या प्रकरणी कायदेशीर लढा लढण्यासाठी आमची तयारी असल्याचे चित्रा वाघ यांनी  माध्यमांशी बोलताना सांगितले .