लग्नाच्या रथाखाली सापडून चिमुकल्याचा बालकाचा मृत्यू

0
67

इचलकरंजी (प्रतिनिधी) : लग्नाच्या वरातीकरता वापरल्या जाणारा रथ बॅटरी चार्ज करण्याकरिता मागे पुढे करत असताना चालकाचा ताबा सुटून चिमुकल्याला ठोकरल्याने त्यांचा मृत्यू झाला. श्लोक कलगोंडा पाटील (वय ४) असे त्याचे नाव असून हा प्रकार हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावालगत असणाऱ्या आवळे हायस्कूलजवळील रिकाम्या जागेमध्ये आज (बुधवार) घडला.

या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाणेमध्ये झाली असून चालक रामचंद्र दत्तू राजमाने (वय ५०) याला ताब्यात घेण्यात आले आहे. श्लोक पाटील याच्या अपघाती मृत्यूनंतर भागामध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश कोरे करीत आहेत.