कोल्हापूरच्या चिमुकल्याने सर केले ३,८०० फुटांवरील शिखर…

0
397

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाने गेले दहा महिने लहान मुलांना घरात बसवले आहे. या काळात मुलांचे शाळेत जाणेही बंद असल्यामुळे बरीच मुले मोबाईलच्या विळख्यात सापडली आहेत. घरातील मोठे लोक बाहेर पडू देत नाहीत त्यामुळे मुलांची सर्व प्रकारची वाढ खुंटत चालली आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी चालले पळणे तसेच विविध खेळ यांची गरज असते. मुलांना बाहेर न पडू देणाऱ्या अशा पालकांच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारी किमया हरिमंदीर, दुधाळी येथील अर्णव सकपाळ या पाच वर्षाच्या मुलाने केली आहे.

जो अर्णव साध्या अपार्टमेंटच्या पायऱ्या चढताना व उतरताना घाबरायचा, त्यानेच  चक्क ३,८०० फुटावरील चिपळूण जवळील नागेश्वर हे शिखर सर केले आहे. तरूण मुलांचीही दमछाक करणारा हा ट्रेक अर्णव याने सलग सात तास चालून कोणाचीही मदत न घेता पूर्ण केला आहे. अर्णवला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या घरचे सर्वजण सहभागी झाले होते. यात पन्नास वर्षे वयावरील जास्त लोकांचा सहभाग होता.

त्यामध्ये त्याची आजी वर्षा सकपाळ, अनिता रणदिवे, आत्या प्रणाली सकपाळ, मावशी श्रुती चौगुले, श्रेया चौगुले, मामा शशांक रणदिवे, अनिश रणदिवे, आशिष रणदिवे, सुप्रिया चौगुले, रोहित चौगुले, वैभव मुरारी या सर्वांनी सहभाग नोंदवला होता. या मोहिमेचे नेतृत्व  डॉ. प्रमोद चौगुले यांनी केले