चेन्नई (वृत्तसंस्था) : तामिळनाडूतील कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचे Mi- 17V5 हे हेलिकॉप्टर कोसळले. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून  संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.  

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.  स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, अपघात झालेले ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे मदतकार्य पोहचविण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे.