चेन्नई (वृत्तसंस्था) : देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचे आज (बुधवार) हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले. अपघातात सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले, अशी माहिती भारतीय हवाई दलाने ट्विटर हँडलवरून दिली आहे.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय भारतीय वायुदलाचे एमआय १७ ५ व्ही हे या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या कोया हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. दरम्यान, आज दुपारी (बुधवारी) तामिळनाडूच्या कुन्नूर भागात हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटनाग्रस्त झाले. त्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले.