मुंबई (प्रतिनिधी) :  राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडला आहे.  सुप्रिम कोर्टाने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवर आपली प्रतिक्रिया देताना आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायलयाने उद्या (गुरुवार) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या सकाळी अकरा वाजता बहुमत चाचणी होणार होती. मात्र, बहुमत चाचणी होण्या आधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.