कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज (शुक्रवारी) सायंकाळी ५.४५ वा. कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत मंत्री उदय सामंत, आ. महेश शिंदे यांचेही आगमन झाले. यावेळी खासदार सर्वश्री प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आ. जयंत आसगावकर, आ. प्रकाश आबिटकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.