कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या १५ व्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशनच्या कोविड केअर सेंटरसाठी ५ लाखांचा जनरेटर देण्याच्या घोषणेला आठवडा होतो न होतो, तोच प्रत्यक्षात आयसोलेशमध्ये आज (गुरुवार) जनरेटर कार्यान्वीत झाला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये लोकसहभागातून विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार अनेक सुविधा दानशूरांच्या मदतीतून उभ्याही राहिल्या. पण आयसोलेशेन हॉस्पिटल येथे नव्याने उभ्या केलेल्या कोविड केअर सेंटरला जनरेटरची खरी गरज होती. ही बाब श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विनंती करताच क्षणाची विलंब न करता आपले नातू राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या १५ व्या वाढदिवसाचे औचित साधून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आयसोलेशनच्या कोविड केअर सेंटरसाठी ५ लाखाचा जनरेटर देण्याच्या घोषणा केली होती. त्याला आज अवघे सात दिवस झाले. अन प्रत्यक्षात आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये जनरेटर बसवला असून, त्याचा शुभारंभही आज राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या हस्ते आणि महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर संजय मोहिते, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे याही उपस्थितीत होत्या.

कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपायोजनासाठी महापालिका राबवित असलेल्या उपायोजनांना आज प्रत्यक्षपणे कोल्हापूरच्या राजे घराण्याने ५ लाखाचा जनरेटर देऊन राजे घराण्याने आपले राजेपन दातृत्वाच्या भूमिकेतून कोल्हापूरवासीयांना दाखवून दिल्याबददल महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी राजे घराण्याचे ऋण व्यक्त केले.

याप्रसंगी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा सांगून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आयसोलेशनला भेट दिलेल्या जनरेटरच्या उपक्रमाबददल आभार व्यक्त केले आणि किर्लोस्कर कंपनीच्यावतीने आणखीन एक जनरेटर महापालिकेच्या हॉस्पिटलला उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आयुक्तांच्या या भूमिकेला किर्लोस्कर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमास नगरसेवक अर्जुन माने, नगरसेविका अश्विनी बारामते, पूजा नाईकनवरे, सहा.आयुक्त विनायक औंधकर, उदयोगपती तेज घाटगे, वैदयकिय अधिकारी डॉ. रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.