संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात… (व्हिडिओ)

0
142

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आज (शनिवार) संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिन अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर संभाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक घालून पुष्पवृष्टी करण्यात आली. क्षात्र पुरोहित रामदास पाटील यांनी सत्यशोधक पद्धतीने राज्याभिषेकाचे सर्व संस्कार केले. हा सोहळा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात आल्यानं दहा हजार लोकांनी याचा लाभ घेतला.

 

 

या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अंकुर कावळे, रोहन पलंगे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, हर्षद घाडगे, अरविंद महाजन, अश्विन वागळे, अजय शिंदे,  अनिल पाटील, प्रशांत सासणे, शाहीर राजू राऊत, शाहीर दिलीप सावंत आदी उपस्थित होते.